ंचिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:10 IST2019-07-01T12:10:33+5:302019-07-01T12:10:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग करुन तिचा बचाव करणा:यास पाच जणांनी बेदम मारहाण ...

The molestation of the woman at Chinchpada | ंचिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग

ंचिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग करुन तिचा बचाव करणा:यास पाच जणांनी बेदम मारहाण केली़ गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिंचपाडा गावात ही घटना घडली़  
भाईदास संभाजी लाडे रा़ चिंचपाडा याने गुरुवारी सायंकाळी महिलेच्या घरात प्रवेश करुन हात पकडून विनयभंग केला होता़ यावेळी परिसरातील एकाने घटना पाहून सोडवासोडवी केली होती़ यानंतर संबधित युवक हा चिंचपाडा बाजारपेठेत कामानिमित्त गेला असता, त्याठिकाणी भाईदास लाडे, राहुल भाईदास लाडे, अजरुन रोहिदास लाडे, दिपक गोरख ढोले, किरण देविदास लाडे सर्व रा़ चिंचपाडा यांनी त्याला मारहाण केली़ 
पिडित महिलेने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरुन पाच संशयितांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत़ 
 

Web Title: The molestation of the woman at Chinchpada