शिक्षिकेच्या पतीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: February 3, 2017 01:02 IST2017-02-03T01:02:42+5:302017-02-03T01:02:42+5:30

अक्कलकुवा : येथील नवोदय विद्यालयात सातवीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्यार्थिनीचा शिक्षिकेच्या पतीनेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Molestation of teacher by teacher's husband | शिक्षिकेच्या पतीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षिकेच्या पतीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग


अक्कलकुवा : येथील नवोदय विद्यालयात सातवीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्यार्थिनीचा शिक्षिकेच्या पतीनेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मोहनलाल दर्शनलाल चोपडा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 30 जानेवारी रोजी घडलेला हा प्रकार शाळा प्रशासनाने  दडपण्याचा प्रयत्न केला होता.
घरात बसलेल्या ‘मोहन’चे विकृत ‘दर्शन’
विद्यालयात मंगळवारी सायंकाळी डायनिंग हॉलमध्ये अभ्यास करणा:या मुलींची पाहणी करण्यासाठी क्रीडा शिक्षिका गेल्या होत्या़ यादरम्यान त्या त्यांचा मोबाइल स्टाफ क्वार्टरमध्ये विसरल्या़ तो आणण्यासाठी त्यांनी सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला पाठवल़े त्या क्वार्टरमध्ये शिक्षिकेचा पती मोहनलाल दर्शनलाल चोपडा हा बसून होता़ विद्यार्थिनीने त्याच्याकडून मोबाइल मागितला असता, त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Molestation of teacher by teacher's husband