दोन तरुणींचे अश्लिल फोटो काढून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:53 IST2019-01-25T16:52:50+5:302019-01-25T16:53:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तरुणींचे अश्लिल फोटो काढून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग करणा:या भांगडा, ता.नंदुरबार येथील ...

Molestation by taking pictures of two women | दोन तरुणींचे अश्लिल फोटो काढून विनयभंग

दोन तरुणींचे अश्लिल फोटो काढून विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तरुणींचे अश्लिल फोटो काढून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग करणा:या भांगडा, ता.नंदुरबार येथील तरुणाविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बदनामीमुळे त्यातील एका तरुणीने विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवकाला अटक करण्यात आली आहे.
मनेश कैलास वसावे रा.भांगडा, ता.नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. वसावे याने 22 वर्षीय तरुणीचे आणि तिच्या मैत्रीणीचे अलि फोटो काढले. आपल्याशी संबध ठेवला नाही तर ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे तरुणी घाबरली. गावातीलच एका तरुणीने या पिढीत तरुणीची बदनामी केली. यामुळे आपली व कुटूंबाची बदनामी झाली याचे वाईट वाटून मनस्थिती खालावलेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मनेश कैलास वसावे याच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत मनेश यास अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीत रवाणगी करण्यात आली आहे. तपास फौजदार रुपाली महाजन करीत आहे.    

Web Title: Molestation by taking pictures of two women