अल्पवयीन तरुणीचा चौपाळे येथे विनयभंग
By Admin | Updated: June 29, 2017 13:28 IST2017-06-29T13:28:15+5:302017-06-29T13:28:15+5:30
चौपाळे येथे 15 वर्षीय युवतीचा तिघांना विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

अल्पवयीन तरुणीचा चौपाळे येथे विनयभंग
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.29 - तालुक्यातील चौपाळे येथे 15 वर्षीय युवतीचा तिघांना विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 7 ते 20 जून दरम्यान बाहेरगावाहून चौपाळे येथे आलेल्या बालिकेसोबत हा प्रकार घडल्याने गावात संताप व्यक्त होत आह़े
चौपाळे येथे बाहेरगावाहून 15 वर्षीय बालिका नातेवाईकांकडे सुटय़ांनिमित्त 7 जून पासून आली होती़ या दरम्यान गावातील मयूर सोमनाथ बेलदार, राजेंद्र संजय बेलदार आणि संजय मोहर बेलदार या तिघांनी तिला 7 ते 20 जून रोजी दुपारच्या सुमारास शेतात घेऊन जायचे आह़े असे सांगत ओढण्याचा प्रयत्न केला़ या दरम्यान तिला व तिच्यासोबत असलेली साक्षीदार या दोघांनाही दमदाटी करून मारहाण केली़
याबाबत तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बालिकेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े