आंबे देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:44 IST2019-06-10T12:44:40+5:302019-06-10T12:44:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आंबे खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग करणा:या एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

आंबे देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आंबे खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग करणा:या एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सिंगा रुबजी वळवी असे संशयीताचे नाव आहे. अक्कलकुवा तालुक्यातील गलोठा शिवारातील शेतात ही घटना घडली. त्या ठिकाणी सिंगा रुबजी याने अल्पवयीन मुलीला आंबे खाऊ घालतो असे सांगितले. त्याकरीता त्याने तेथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर तिला बसविले. तेथे त्याने मुलीचा विनयभंग केला. याबाबत मुलीने ही बाब पालकांना सांगितल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून सिगा रुबजी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एम.जे.पवार करीत आहे.