तक्रार केल्याच्या रागातून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:50 IST2019-04-16T11:49:52+5:302019-04-16T11:50:13+5:30
विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा : तीन महिने होता रस्टीकेट

तक्रार केल्याच्या रागातून विद्यार्थिनीचा विनयभंग
नंदुरबार : महाविद्यालयात तक्रार केल्याच्या रागातून विद्यार्थ्याने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना लोणखेडा महाविद्यालयात घडली. विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणखेडा महाविद्यालयातील विद्यार्थ्याची तक्रार काही विद्यार्थीनींनी प्राचार्यांकडे केली होती. त्या तक्रारीवरून संबधीत विद्यार्थ्याला तीन महिन्यांसाठी महाविद्यालयात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याचा राग विद्यार्थ्याच्या मनात होता. १५ रोजी विद्यार्थ्याने विद्यार्थीनीला महाविद्यालयातील ग्रंथालय परिसरात गाठून तुझ्यामुळे माझे तीन महिन्याचे नुकसान झाले असे सांगून तरुणीशी लज्जास्पद वर्तन केले. शिवाय तिच्या दप्तरातील महाविद्यालयात भरण्यासाठी आणलेले साडेतीन हजार रुपये देखील जबरीने काढून घेतल्याचे विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरून सुलतानपूर, ता.शहादा येथील विद्यार्थ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बडगुजर करीत आहे.