तळोद्यात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग, एकास अटक
By Admin | Updated: April 16, 2017 13:19 IST2017-04-16T13:19:12+5:302017-04-16T13:19:12+5:30
वरिष्ठ महाविद्यालयातील एक तरुणी परीक्षा देऊन महाविद्यालयाबाहेर निघाली असता एका तरुणाने तिचा हात धरून विनयभंग केला.

तळोद्यात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग, एकास अटक
तळोदा,दि.16- : शहरातील वरिष्ठ महाविद्यालयातील एक तरुणी परीक्षा देऊन महाविद्यालयाबाहेर निघाली असता एका तरुणाने तिचा हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे.
तळोद्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील 19 वर्षीय युवती शनिवारी दुपारी परीक्षा देऊन महाविद्यालयाबाहेर पडली. त्याचवेळी संशयित लखन मक्कन पटेल (30) रा.बाळदा, ता.निझर याने तिचा हात धरून खेचून घेतले व विनयभंग केला. संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)