तीनसमाळ येथे महिलेस मारहाण करुन विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:02 IST2019-04-20T19:01:59+5:302019-04-20T19:02:23+5:30
सात जणांविरोधात गुन्हा : पिडीतेची फिर्याद

तीनसमाळ येथे महिलेस मारहाण करुन विनयभंग
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तीनसमाळ येथे महिलेस मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली़ १७ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तीनसमाळ येथील ३० वर्षीय महिलेसोबत मागील भांडणाची कुरापत काढून दौलत लेहऱ्या पावरा यांनी वाद घालता होता़ यावेळी त्याने महिलेचे केस ओढून तिला मारहाण केली होती़ यादरम्यान त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले होते़ दरम्यान चिंतामण हेलज्या पावरा याने महिलेचे तोंड दाबून लज्जा येई असे कृत्य केले़ यावेळी दौलत व चिंतामण पावरा यांच्यासह भाईदास लेहज्या पावरा, जोदा लेहज्या पावरा, विकास लेहज्या पावरा, कुशाल लेहज्या पावरा, सुरेश लेहज्या पावरा यांनी महिलेस मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा धडगाव पोलीस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तीनसमाळ येथे ११ एप्रिल रोजी दोघा महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती़ त्यानंतरच्या या घटनेने खळबळ उडाली आहे़