शेतातील ओलाव्यामुळे कापूस अन मिरची लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:49 IST2019-10-11T11:48:53+5:302019-10-11T11:49:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दस:यापूर्वी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सुरु होणारी कापूस आणि मिरचीची खरेदी यंदा शेतात टिकून असलेल्या ओलाव्यामुळे ...

The moisture in the fields has prolonged cotton un-pepper | शेतातील ओलाव्यामुळे कापूस अन मिरची लांबली

शेतातील ओलाव्यामुळे कापूस अन मिरची लांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दस:यापूर्वी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सुरु होणारी कापूस आणि मिरचीची खरेदी यंदा शेतात टिकून असलेल्या ओलाव्यामुळे लांबणीवर पडली आह़े यातून बाजार ऐन सणासुदीला बंद पडला असून याचा फटका व्यापारी  आणि शेतकरी यांच्यासह मजूरांनाही बसला आह़े       
जिल्ह्यात यंदा पावसाने दीर्घकाळार्पयत लावलेल्या हजेरीमुळे शेतशिवारातील पिके पाण्यात गेली आहेत़ कापूस, मिरची, ज्वारी आणि मकासह इतर धान्य व कडधान्य पिके पाण्यात असल्याचे चित्र आह़े हे पाणी जमिनीत ङिारपत नसल्याने मजूर किंवा यंत्राच्या सहाय्याने तोडणी शक्य झालेले नाही़ परिणामी दस:याला सुरु होणारी कापूस व मिरची खरेदी यंदा दिवाळीच्या तोंडावर सुरु होण्याची चिन्हे आहेत़ यातही कापसातील ओलावा आणि धान्य पिकांवर निर्माण झालेली काजळी शेतक:यांसाठी चिंतेचा विषय असून तूर्तास फक्त नंदुरबार बाजारात ज्वारीची आवक सुरु झाली आह़े यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यास कापसाची बाजार समितीतील आवक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आह़े 
जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा या दोन्ही प्रमुख बाजार समित्यांच्या खरेदी केंद्रांवर एकदोन जिनिंग मालकांकडून काही अंशी कापूस खरेदी सुरु झाली असली तरी कापसातील ओलावा हा अधिक असल्याने वाढीव न मिळाल्याने शेतक:यांना फटका बसला होता़ यामुळे शेतकरी शेतातील ओलावा कमी होण्याची वाट बघत आहेत़ दिवाळीनंतर जिल्ह्यात कापूस, मिरची आणि धान्य बाजार जोमाने सुरु होण्याची अपेक्षा आह़े 

जिल्ह्यात यंदा 2 लाख 74 हजार 583 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली होती़ सप्टेंबर महिन्यार्पयत शेतक:यांनी धान्य व इतर पिकांची पेरणी केली होती़ यात सर्वाधिक 1 लाख 28 हजार 287 हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाचा पेरा झाला आह़े त्याखालोखाल 29 हजार 17 हेक्टर क्षेत्रात ज्वारी तर 34 हजार 598 हेक्टर क्षेत्रात मका पेरणी करण्यात आली होती़ पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ार्पयत हजेरी दिल्याने शेतशिवारातील कापूसावर ओलावा कायम राहीला आह़े तर दुसरीकडे धान्य पिकांच्या शेतात ओलावा कायम असल्याने कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत़ परिणामी शेतक:यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आह़े दस:यापासून नंदुरबार बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रावर एकाच जिनिंग मालकाकडून कापूस खरेदी करण्यात आली आह़े साधारण साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दर शेतक:यांना मिळाला होता़ यातून साधारण आतार्पयत 500 क्विंटलर्पयत कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती आह़े सीसीआयकडून यंदाही 5 हजार 500 रुपये हमीभाव जाहिर झाला आह़े परंतू सीसीआय दिवाळीनंतर नंदुरबार आणि शहाद्यातील केंद्रावर कापूस खरेदी होणार असल्याची माहिती आह़े तत्पूर्वी खाजगी व्यापारी आणि सूतगिरणी यांनी चांगला भाव दिल्यास शेतकरी कापूस विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आह़े 

नंदुरबार बाजारात गेल्या आठ दिवसांपासून ज्वारीची आवक सुरु झाली आह़े या ज्वारीला व्यापारी 1 हजार 800 ते 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर देत आहेत़ आवक होणारी ज्वारी ही काळी पडलेली असली तरी व्यापारी खरेदी करुन साठा करत आहेत़ आतार्पयत नंदुरबार बाजारात साडेचार हजार क्विंटल ज्वारी आवक झाल्याची माहिती आह़े पावसामुळे यंदा मिरची हंगामही लांबणीवर पडला असून 1 हजार 800 ते 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळूनही ओली मिरची बाजारात दाखल झालेली नाही़ काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक:यांना बाजारात मिरची आणणे शक्य झालेले नाही़ 
 

Web Title: The moisture in the fields has prolonged cotton un-pepper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.