सातपुडा साखर कारखान्यात मॉकड्रिल कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:11+5:302021-03-05T04:31:11+5:30
कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन तंत्रज्ञान विकसित ...

सातपुडा साखर कारखान्यात मॉकड्रिल कार्यक्रम
कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याचाही अवलंब सातपुडा कारखाना नेहमी करून घेतो. म्हणून फायर शट ऑफ अॅटोमॅटिक पोर्टेबल सिलिंडर (बॉल) कारखान्याचा साखर व डिस्टिलरी विभागासाठी घेण्यात आला असून तो कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सुरक्षा विभागाचे प्रमुख गोसावी यांच्याकडे सुपूर्द केले व त्याचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी जनरल मॅनेजर अशोक पाटील, इलेक़्ट्रिक इंजिनिअर प्रल्हाद पटेल उपस्थित होते. तसेच सातपुडा सहकारी साखर कारखान्यात औद्योगिक सुरक्षा दिनाच्या निमित्ताने कामगारांना औद्योगिक उपकरणे व अग्निरोधक सिलिंडरविषयी माहिती कारखान्याचे सुरक्षा अधिकारी भरतगीर गोसावी यांनी उपस्थित कामगार व सुरक्षा रक्षकांसमोर प्रात्यक्षिकासह करून दाखविले. या कार्यक्रमास एक्साईज विभागाचे उपनिरीक्षक अजितकुमार नाईकुळे, सिनिअर केमिस्ट माणिकराव कचरू आदिक, अॅटोमेशन मॅनेजर मिलिंद पटेल, असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर राजेश पटेल तसेच सुरक्षा रक्षक व कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन संपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले.