मोबाईल दुकान फोडून ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:25 IST2020-09-22T12:25:46+5:302020-09-22T12:25:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईल दुरूस्तीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना ...

मोबाईल दुकान फोडून ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोबाईल दुरूस्तीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली़ शहरातील बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी हे दुकान आहे़
बसस्थानक परिसरात सत्कार मोबाईल या दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसून आले होते़ नागरिकांनी दुकानमालकाला माहिती दिल्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेतली होती़ दरवाजा उघडून आत तपासणी केली असता, दुरूस्तीसाठी आलेले ३० मोबाईल आणि १६ हजार रूपये रोख असा ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी मेहरोज सनावर खान याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शनिवारी सायंकाळी सात ते रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान ही चोरी झाली आहे़ रविवारी जनता कर्फ्यू असल्याने या भागात शुकशुकाट होता़ त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला होता़