कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST2021-09-23T04:34:08+5:302021-09-23T04:34:08+5:30

धडगाव : परिसरातील भ्रमणध्वनी सेवा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली ...

Mobile phone sufferers due to low range | कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त

कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त

धडगाव : परिसरातील भ्रमणध्वनी सेवा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मद्यपी चालकांवर कारवाई करा

नवापूर : तालुक्यात अनेक दुचाकी, तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी सूज्ञ नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न कायम आहे.

पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त

नंदुरबार : शहरातील म्हाडा काॅलनी, हुडको काॅलनी, जयचंद नगर आदी भागातील अनेक पथदिवे रात्रीच्या वेळी बंद राहत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Mobile phone sufferers due to low range