जमावाचा पोलिसावर हल्ला, वाहनाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:51 IST2019-04-16T11:50:59+5:302019-04-16T11:51:18+5:30

नगाव : दोन पोलीस किरकोळ जखमी

The mob attacked the policemen, the vehicle collapsed | जमावाचा पोलिसावर हल्ला, वाहनाची तोडफोड

जमावाचा पोलिसावर हल्ला, वाहनाची तोडफोड

नंदुरबार : दोन समाजातील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना नगाव, ता.नंदुरबार येथे घडली. याबाबत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार बापू बागुल व प्रकाश अहिरे हे जखमी झाले. नगाव येथे दोन समाजात वाद होऊन हाणामारी झाली होती. यावेळी पोलिसांनी धाव घेवून दोन्ही समाजातील लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका समाजातील गटाचा गैरसमज होऊन जमावाने पोलिसांवर हल्ला केला. हवालदार प्रकाश अहिरे व बापू बागुल हे किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या वाहनावर (क्रमांक एमएच ३९-ए २२४) दगडफेक करून काचा फोडल्या. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविताच जमाव तेथून पसार झाला.
याबाबत हवालदार प्रकाश अहिरे यांनी फिर्याद दिल्याने ज्ञानेश्वर शिवराम भिल, युवराज भिल, तुकाराम शेमळे, सरदार भिल, अंकुश चुनिलाल भिल व आणखी एकजण अशांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The mob attacked the policemen, the vehicle collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.