पैशांच्या देवाण घेवाणवरून जमावाची मारहाण
By Admin | Updated: January 18, 2017 23:32 IST2017-01-18T23:32:42+5:302017-01-18T23:32:42+5:30
आर्थिक देवाण घेवाणच्या वादातून सात जणांनी सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्याची घटना नंदुरबारातील सी.बी.लॉन्सजवळ घडली.

पैशांच्या देवाण घेवाणवरून जमावाची मारहाण
नंदुरबार : आर्थिक देवाण घेवाणच्या वादातून सात जणांनी सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्याची घटना नंदुरबारातील सी.बी.लॉन्सजवळ घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील वाघोदा रस्त्यावरील सी.बी.लॉन्स भागात काहीजण आपसात हाणामारी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपनगर पोलीस ठाण्याचे पथकाने जावून युवकांना ताब्यात घेतले. याबाबत पोलीस हवालदार योगेश निकम यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून हेमंत ज्ञानेश्वर चौधरी, प्रभाकर भिका चौधरी, गोलू गुलाब चौधरी रा.चौधरी गल्ली, संकेत रामेश्वर सोनार रा.महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ, दीपक कैलास बैसाणे रा.साक्रीनाका, राहुल संतोष चौधरी रा.जळकाबाजार व जितेंद्र कामराज माळवे रा.देसाईपुरा यांच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : शहरातील धुळे रस्त्यावरील पथदिवे वारंवार बंद राहत असल्यामुळे या भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.