मनसे जिल्हाध्यक्ष हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:08 IST2020-02-08T13:07:34+5:302020-02-08T13:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मनसेचे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे यांच्यावर चौघांनी हल्ला करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ ...

मनसे जिल्हाध्यक्ष हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : मनसेचे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे यांच्यावर चौघांनी हल्ला करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली होती़ घटनेनंतर रात्री उशिरा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हल्ला करणारे चौघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़
जखमी असलेले सोनवणे यांंचा मुलगा चिरायू या तळोद्यातील जिममध्ये जयदीप माळी याच्यासोबत वाद झाला होता़ या वादातून जयदीप याने तिघांना सोबत घेत हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे़ याप्रकरणीदिनेश पुंडलिक माळी, जयदीप दिनेश माळी, जयेंद्र पुंडलिक माळी यांच्यासह आणखी अशा चौघांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान हल्ल्यात जखमी झालेले अजय सोनवणे यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथून गुजरातमधील नवसारी येथे हलवण्यात आले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांना अटक करण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी दिली आहे़ घटनेची तळोदा एकच चर्चा रंगली आहे़