Vidhan Sabha 2019: आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:53 IST2019-10-01T16:42:04+5:302019-10-01T16:53:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानपरिषदेचे सदस्य व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी आपल्या ...

MLA Chandrakant Raghuvanshi on the path of Shiv Sena | Vidhan Sabha 2019: आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेच्या वाटेवर

Vidhan Sabha 2019: आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेच्या वाटेवर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानपरिषदेचे सदस्य व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आह़े दरम्यान उद्या त्यांचा शिवसेना पक्षप्रवेशाचे मूहूर्त ठरले असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े  
नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी हे पूर्वापार काँग्रेसनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत़ त्यांचे वडील कै़बटेसिंह रघुवंशी हे तीनवेळा काँग्रेसतर्फे विधानपरिषदेचे सदस्य होत़े त्यांच्यानंतर आमदार रघुवंशी हे सलग तिस:यांदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत़ पुढील वर्षी त्यांच्या आमदारकीची मुदत संपत आह़े जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या प्रभाव असून गेल्या दोन दशकांपासून ते काँग्रेसची जिल्ह्याची धुरा सांभाळत आहेत़ गेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्याने प्रकृतीच्या कारणामुळे ते निवडणूकीपासून लांब होत़े सोशल मिडियातून त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला़ या विधानसभा निवडणूकीत ते पूर्वीप्रमाणे जोशाने काँग्रेसची धुरा खांद्यावर घेत प्रचारात सक्रीय होतील अशी काँग्रेस कार्यकत्र्याना अपेक्षा होती़ मात्र महिन्याभरापासून ते फारसे सक्रीय न झाल्याने कार्यकत्र्यामध्ये साशंकता होती़ या पाश्र्वभूमीवर त्यांनी अखेर आपले मौन सोडून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होताच राजकारणाचा घडामोडींना वेग देत मंगळवारी मुंबई गाठून आमदारकीचा राजीनामा दिला आह़े 
ते भाजप की, शिवसेनेत प्रवेश करतील याबाबत चर्चा होती़ मात्र ते आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास नक्की झाले आह़े त्यांच्या कार्यकत्र्यानीही तसे बॅनर व सोशल मिडियावर प्रचार सुरु केला असून बुधवार दि़ 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते आवाहन करीत आहेत़ 

Web Title: MLA Chandrakant Raghuvanshi on the path of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.