‘एमकेसीएल’चा सावळा गोंधळ : बीएड् तिसरी प्रवेश फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:04 IST2018-10-10T13:04:00+5:302018-10-10T13:04:05+5:30
विद्याथ्र्याचे ‘मेरीट’ घसरल्याने मनस्ताप

‘एमकेसीएल’चा सावळा गोंधळ : बीएड् तिसरी प्रवेश फेरी
नंदुरबार : बीएड्च्या तिस:या प्रवेश फेरी प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमीटेडचा (एमकेसीएल) सावळा गोंधळ समोर आला आह़े नुकतील बीएड्ची तिसरी प्रवेश फेरी पूर्ण झाली असून यात, ज्या विद्याथ्र्याना सीईटीमध्ये जास्त गुण आहे, त्यांचा प्रवेश फेरी यादीत समावेश नसल्याचे दिसून येत आह़े प्रवेश अर्ज ‘एडिट’ केल्यामुळे संबंधित विद्याथ्र्याचे ‘मेरीट’ घसरल्याचे एमकेसीएलचे राज्य समन्वयक अजित शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले
बीएड् प्रवेशासाठी नुकतीच तिसरी प्रवेश फेरी घेण्यात आली़ यात, अनेक विद्याथ्र्याना बीएड् सीईटीमध्ये अधिक गुण असूनही तुलनेत कमी गुण असलेल्या विद्याथ्र्याना स्थान देण्यात आले असल्याने विद्याथ्र्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े सारखाच विषय, जातीवर आधारीत कोटा असतानाही यादीत स्थान न मिळाल्याने विद्याथ्र्यासह पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आह़े याबाबत पालकांकडून ऑनलाईन परीक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या ‘एमकेसीएल’शी संपर्क साधण्यात आला़
साधारणत: दोन आठवडय़ांपूर्वी दिवसांपूर्वी बीएड्चे प्रवेश अर्ज एडिट करुन त्यात बदल करण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आलेली होती़ यात विद्याथ्र्याच्या सोयीनुसार महाविद्यालयात बदल करणे, विविध दाखले अपलोड करणे, विषयांचे गुण भरणे आदी बदल विद्याथ्र्याकडून करण्यात आले होत़े त्यामुळे ज्या विद्याथ्र्यानी प्रवेश अर्ज एडिट केला आह़े अशा विद्याथ्र्याचे ‘मेरीट’ ज्या विद्याथ्र्यानी प्रवेश अर्जात बदल केलेला नाही अशांच्या मागे गेल्याचे ‘एमकेसीएल’कडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे ज्या विद्याथ्र्याना सीईटीमध्ये अधिक गुण आहे अशांनाही तीस:या प्रवेश फेरीतील गुणवत्ता यादीत स्थान मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आह़े
विद्याथ्र्याच्या नुकसानीला जबाबदार कोण?
दरम्यान, तिस:या प्रवेश फेरीच्या यादीत ज्या पात्र विद्याथ्र्याना स्थान मिळाले नाही अशा विद्याथ्र्याच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विद्याथ्र्याकडून विचारण्यात येत आह़े विद्याथ्र्याना आता चौथ्या प्रवेश फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आह़े चौथी प्रवेश फेरी ही ‘स्पॉट अॅडमीशन’ असल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आह़े
जिल्ह्यातील विविध शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये बीएड्च्या उपलब्ध जागा व एकूण प्रवेश बघता सर्व इच्छिूक विद्याथ्र्याना बीएड्ला प्रवेश मिळू शकतो अशी स्थिती आह़े
परंतु तीस:या प्रवेश फेरीतील यादीत स्थान न मिळाल्याने विद्याथ्र्याना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े
दरम्यान, ज्या विद्याथ्र्यानी आपला प्रवेश अर्ज एडिट केलाय अशांचे मिरीट इतर विद्याथ्र्याच्या मागे जाईल अशा स्पष्ट सुचना ‘एमकेसीएल’कडून देणे अपेक्षीत होत़े परंतु तसे काहीच झाले नसल्याचे दिसून येत आह़े तसेच एमकेसीएलकडून विविध शिक्षणशास्त्र महाविद्यालयांनाही याबाबत सूचना केली नसल्याची माहिती देण्यात आलेली आह़े त्यामुळे एमकेसीएलकडून विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान करण्यात येत असल्याचेही म्हटले जात आह़े
दरम्यान, तीस:या प्रवेश फेरीच्या यादी नाव असलेल्या पात्र विद्याथ्र्याना 10 ऑक्टोबर्पयत संबंधित महाविद्यालयात जावून आपली प्रवेश निश्चिती करावयाची आह़े त्यानंतर साधारणत: आठवडाभराने स्पॉट अॅडमिशन होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े