सोनार गल्लीतील रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST2021-01-09T04:26:34+5:302021-01-09T04:26:34+5:30
नंदुरबार : शहरातील सोनार खुंट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याची दुरवस्था झाली असून, जळका बाजार ते पाताळगंगा ...

सोनार गल्लीतील रस्त्याची दयनीय अवस्था
नंदुरबार : शहरातील सोनार खुंट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याची दुरवस्था झाली असून, जळका बाजार ते पाताळगंगा नदीच्या पुलापर्यंतचा रस्ता पूर्ण खड्ड्यामुळे खड्डेमय झाला आहे. वाहने चालवितांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती कधी करण्यात येईल? असा प्रश्न वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
शौचालयाची दुरवस्थाने घाणीचे साम्राज्य
नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथील महिला सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. या महिला सार्वजनिक शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, शौचालयात वराहाचा वावर वाढल्याने महिलांना वराहामुळे इजा होण्याऱ्या घटना घडत आहेत. अद्ययावत शौचालय व पुरेशा प्रकाशाची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आहे.
मोकाट श्वानांमुळे भीतीचे वातावरण
नंदुरबार : शहरात लहान मुले व वाहनधारकांना श्वान चावण्याच्या अनेक घटना घडत असताना वृंदावन कॉलनी, हाटदरवाजा व नेहरूचौक भागात मोकाट श्वानांपासून परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने पालिका प्रशासनाने दखल घेऊन या भागातील श्वानांचे पुनर्वसन करावे, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.