विद्यार्थी खून प्रकरणातील अल्पवयीन संशयीत निदरेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:43 IST2019-10-12T12:43:27+5:302019-10-12T12:43:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डी़आऱहायस्कूलचा विद्यार्थी राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा बाल न्यायालयाने एका अल्पवयीन आरोपीची निदरेष ...

विद्यार्थी खून प्रकरणातील अल्पवयीन संशयीत निदरेष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डी़आऱहायस्कूलचा विद्यार्थी राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा बाल न्यायालयाने एका अल्पवयीन आरोपीची निदरेष मुक्तता केली आह़े जुलै 2017 मध्ये खुनाची घटना घडली होती़
कोकणी हील परिसरात राहणारा राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघा अल्पवयीन संयशितांना पोलीसांनी ताब्यात घेतले होत़े यातील एका बालकाविरोधात पोलीसांनी नंदुरबार बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होत़े खटल्याचे कामकाज नंदुरबार बालन्यायालयात सुरु करण्यात आले होत़े याठिकाणी फिर्यादींकडून 16 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या़ कामकाजादरम्यान सोन्याचे जप्त केलेले दागिने, सीसीटीव्ही फुटेज, घटनेचे साक्षीदार पंच, वैैद्यकीय अधिकारी यांचे पुरावे न्यायालयापुढे फिर्यादी पक्षाकडून देण्यात आले होत़े हे पुरावे आणि तपासात त्रुटी असल्याचा युक्तीवाद आरोपीचे वकील अॅड़ मौसम चौधरी यांनी केला होता़ त्यांनी न्यायायलयासमोर बालकाची बाजू मांडली होती़ अॅड़ चौधरी यांच्या युक्तीवादानंतर बाल न्यायालयाने साक्षी पुरावे तपासून बालकाची निदरेष मुक्तता करण्याचा निकाल शुक्रवारी न्यायमूर्ती एस़ए़विराणी व बोर्डाचे सदस्य अॅड़ संजय पुराणिक, अॅड़ सीमा खत्री यांनी शुक्रवारी हा निकाल दिला़
या निकालाकडे शहरातील पालकांचे लक्ष लागून होत़े 2 जुलै 2017 रोजी राज ठाकरे याचा खून झाला होता़