अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन ठार मारण्याची धमकी देणा:यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:46 IST2019-06-22T11:46:36+5:302019-06-22T11:46:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिच्यासह आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी देणा:यास शहादा पोलीसांनी अटक केली आह़े ...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन ठार मारण्याची धमकी देणा:यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिच्यासह आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी देणा:यास शहादा पोलीसांनी अटक केली आह़े 17 जून रोजी संशयिताने अत्याचार केल्याची घटना घडली होती़
शहाद्यातील अल्पवयीन विद्यार्थिनी सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने स्कूटीने शाळेत जाण्यासाठी निघाली होती़ यावेळी कपील संतोष तिरमले याने तिला डोंगरगाव रस्त्यावर सोडून दे असे सांगत दुचाकीचा ताबा घेत बालिकेला मागे बसवून शाळेकडे घेऊन गेला होता़ दरम्यान शाळेत न जाता कपील तिरमले याने दुचाकी डोंगरगाव रस्त्यावरील खाजगी शाळेच्या बाजूस असलेल्या पडीत घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला़ त्याच्या अत्याचाराला विरोध करत असताना तिच्यासह आई-वडीलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ झालेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या पिडीत विद्यार्थिनीने आई-वडीलांना हा प्रकार कथन केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी शहादा पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची माहिती दिली़ याप्रकरणी पिडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित कपील तिरमले याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 व अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणामुळे शहादा शहरात खळबळ उडाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा पालकांकडून निषेध केला गेला़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड करत आहेत़
उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक एस़क़ेजाधव यांनी युवतीची भेट घेत घटनेची माहिती जाणून घेतली़ उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने संशयित कपील यास ताब्यात घेतले आह़े त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आह़े