अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: June 5, 2017 12:11 IST2017-06-05T12:11:48+5:302017-06-05T12:11:48+5:30

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चांदपूर, ता.अक्कलकुवा येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Minor girl molestation, crime against trio | अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.5- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चांदपूर, ता.अक्कलकुवा येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 जून रोजी अडीच वाजता घडली. 
चांदपूर येथील 16 वर्षीय युवती गावालगतच्या शेतात काम करीत असतांना गावातीलच विजय देवसिंग वसावे, रमेश अमरसिंग पाडवी, तेजस रतिलाल वसावे तेथे गेले. युवतीला एकटे गाठून विनयभंग केला. विजय वसावे याने युवतीचा हात धरून ओढाताण करू लागला. त्याला रमेश पाडवी व तेजस वसावे यांनी त्याला मदत केली. त्यांच्या तावडीतून सुटून युवतीने तेथून पळ काढला. युवतीने फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अपराध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor girl molestation, crime against trio