आंदोलनकर्ती मयत महिलेच्या कुटूंबियांचे मंत्र्यांकडून सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:23 IST2021-02-06T12:23:19+5:302021-02-06T12:23:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्लीतील शेतकरी ...

Minister offers condolences to the family of the agitating deceased woman | आंदोलनकर्ती मयत महिलेच्या कुटूंबियांचे मंत्र्यांकडून सांत्वन

आंदोलनकर्ती मयत महिलेच्या कुटूंबियांचे मंत्र्यांकडून सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील महिला कार्यकर्त्या स्व.सीताबाई रामदास तडवी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 
आपण स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना   जाणतो. स्व. सीताबाई यांच्यासारख्या शेतीवर निष्ठा ठेवणाऱ्यांमुळे      शेतकरी उभा राहीला आहे. त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची प्रेरणा घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत. सीताबाई यांच्या कुटुंबियांना गोटफार्म देण्यात येईल असे केदार यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या समवेत जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभपापती निर्मला राऊत, तहसीलदार ए.एम.शिंत्रे,   पशुधन विकास अधिकारीडॉ.गणेश पालवे, जि.प.सदस्य अजित वसावे, सरपंच चंदूभाई तडवी, लोकसंघर्ष मोर्चाचे संजय महाजन, स्मिता देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री केदार हे धुळे मार्गे परस्पर आंबाबारी येथे दाखल झाले. पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. 

Web Title: Minister offers condolences to the family of the agitating deceased woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.