एमआयएमची काँग्रेसशी काडीमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:26 IST2020-01-30T11:25:50+5:302020-01-30T11:26:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एमआयएमआय पक्षाने शहादा नगर पालिकेत काँग्रेसला दिलेला पाठींबा काढल्याचे एमआयएमआयचे तालुकाध्यक्ष साजीद पिंजारी यांनी ...

एमआयएमची काँग्रेसशी काडीमोड
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : एमआयएमआय पक्षाने शहादा नगर पालिकेत काँग्रेसला दिलेला पाठींबा काढल्याचे एमआयएमआयचे तालुकाध्यक्ष साजीद पिंजारी यांनी सांगितले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश करून मतदारांचा अपमान केल्याचा आरोपही पिंजारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शहादा पालिकेत मंगळवारी विषय समित्या निवडणुकीत एमआयएमआयचे तीन निवडून आलेले नगरसेवक व एक स्विकृत नगरसेवक अशा चौघांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने याबाबतचा खुलासा करण्यासाठी साजीद पिंजारी यांनी त्यांच्या पत्रकार परिषद घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएमआयने शहादा नगरपालिकेत काँग्रेसला पाठींबा दिला होता व त्यामुळेच काँग्रेसला उपनगराध्यक्षपद मिळाले होते, असे सांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून मतदारांचा विश्वास घात केल्याचा आरोप पिंजारी यांनी केला. एमआयएआयच्या चार नगरसेवकांनी ही पक्षाच्या विचारांना तिलांजली देत विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपाची साथ दिल्याने या चौघा नगरसेवकांवर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारवाई होणार असल्याचेही पिंजारी यांनी सांगितले.
शहादा पालिकेत जायदा बी रहीम पिंजारी याच एकमेव व अधिकृत सदस्या असून, पालिकेत त्याच पक्षाची भूमिका मांडतील, असेही साजीद पिंजारी यांनी सांगितले.
शहादा पालिकेत काँग्रेस व एमआयएमने भाजपा विरोधात निवडणुकीनंतर आघाडी केली होती. नगराध्यक्ष भाजपाचा तर बहुमत काँग्रेस-एमआयएमकडे अशी स्थिती पालिकेत होती.