लाखो रुपये खचरून बांधलेली इमारत धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 10:59 IST2019-11-25T10:59:16+5:302019-11-25T10:59:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याची इमारत वर्षभरापासून धूळखात ...

लाखो रुपये खचरून बांधलेली इमारत धूळखात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याची इमारत वर्षभरापासून धूळखात आहे. यंदाच्या पावसाळ्यात इमारत आवारात चार ते पाच फूट गवत उगवले आहे. गदरूले देखील या ठिकाणी भटकत असल्यामुळे त्यांना ते सोयीचे ठरले आहे. तातडीने तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज या नवीन इमारतीत सुरू करावे अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेकडून होत आहे.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याची इमारत पूर्वीपासून जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात ब्रिटीशकालीन इमारतीत होती. अतिशय तोकडय़ा जागेत तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज वर्षानुवर्ष चालले. त्यानंतर त्याच ठिकाणी असलेले शहर पोलीस ठाणे हाटदरवाजाजवळील जुन्या कोषागार कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आल्यानंतर ही इमारत तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. परंतु दोन वर्षापूर्वी पुन्हा शहर पोलीस ठाणे जुन्याच इमारतीत स्थलांतर करून तेथे तालुका पोलीस ठाणे कार्यान्वीत करण्यात आले. याच दरम्यान तालुका पोलीस ठाण्यासाठी जागा मिळून तेथे इमारत बांधकामही करण्यात आले.
गावाबाहेर निजर्नस्थळी जागा
तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी शहराबाहेर उमर्दे रस्त्यावर निजर्न स्थळी जागा देण्यात आली. एका बाजुुला रेल्वे मार्ग तर दुस:या बाजुला खाजगी कंपनी आहे. आजुबाजुला सर्व शेत शिवार आहे. रहिवास वस्ती या भागात नसल्यामुळे निजर्नस्थळी जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जागा मंजुर करतांना या सर्व बाबींचा विचार करून ती मंजुर केली गेली पाहिजे होती, परंतु त्याबाबत ना पोलीस दल ना प्रशासनाने विचार केल्याचे दिसून येते.
रात्री, अपरात्री या ठिकाणी जाणे म्हणजे मोठे दिव्य राहणार आहे. त्यामुळे तालुक्यातील लांबवरच्या गावातून आलेल्या नागरिकाला त्रास सहन करावा लागेल हे मात्र निश्चित.
सुविधांयुक्त इमारत
या ठिकाणी बांधण्यात आलेली इमारत ही सर्व सोयीसुविधांयुक्त आहे. पोलीस निरिक्षकांचे स्वतंत्र दालन, सहायक व उपनिरिक्षक यांचे दालन, ठाणे अंमलदारची रूम, साहित्य व शस्त्र ठेवण्याची कस्टडी, आराम कक्ष, अभ्यागतांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कच्च्या आरोपींना ठेवण्यासाठीची सोय, स्वच्छतागृहे आदी सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात प्रशस्त जागा आहे. या ठिकाणी वाहनतळ आणि जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा आहे. आजुबाजुला पक्के कुंपन बांधण्यात आले आहे.
इमारतीचे नुकसान
सर्व सुविधांयुक्त असलेली इमारत गेल्या वर्षभरापासून पडून आहे. या ठिकाणी दिवसा गुराखींचे विश्रांती स्थान असते तर इतर वेळी गदरुल्ले देखील या भागात भटकत असतात. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी गवताचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचे तळे साचले होते. त्यामुळे या ठिकाणी विषारी जनावरे देखील मोठय़ा प्रमाणावर असण्याची शक्यता आहे.
सध्या असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीत सुविधांचा अभाव आहे. शिवाय जागेचेही अडचण आहे.
नवीन इमारत सुविधांयुक्त तयार असतांनाही पोलीस दल ही इमारत ताब्यात घेण्यास का कुचराई करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्षभरापूर्वी इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. परंतु तो ऐनवेळी रद्द करण्यात आला.