होळीसाठी स्थलांतरित मजूर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:46 IST2020-02-29T12:45:23+5:302020-02-29T12:46:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने जिल्ह्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत झाले होते. त्यात आदिवासी बांधवांचा समावेश ...

होळीसाठी स्थलांतरित मजूर परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने जिल्ह्यातील मजूर उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत झाले होते. त्यात आदिवासी बांधवांचा समावेश असून याच बांधवांचा सर्वात मोठा सण असलेल्या होळीसाठी ते मूळगावी परतले आहे.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीतील कामे नोव्हेंबरपर्यंत आटोपून बहुसंख्य मजूर रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलांतरीत झाले होते. स्थलांतर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांचाच समावेश असतो. त्यानुसार यंदाही हे मजूर आक्टोबर व नोव्हेंबरमध्येच स्थलांतरीत झाले होते. यंदा धडगाव व अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील मजूर गुजरातमधील तापी, नर्मदा जिल्हा, मध्यप्रदेशातील धार, झांबुआ तर महाराष्टÑातील, पुणे, पंढरपूर, सातारा, अहमदनगर यासह विविध जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झाले होते.
याच आदिवासी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात मोठा ठरणाºया होळी उत्सवही कारखान्यांचा हंगाम संपण्याच्या कालावधीतच आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठीच हे मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहे. त्यात धडगाव तालुक्यातील चांदसैली, काकरपाटी, गौºया, झुम्मट, खामला अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी तर तळोदा तालुक्यातील आंबागव्हाण येथील मजूर परतले आहे.