लॉकडाऊनमध्ये मनरेगाच्या कामांना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:07 IST2020-05-10T12:07:31+5:302020-05-10T12:07:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे ठप्प असलेल्या रोजगारांच्या कामांना हळू हळू वेग येत आहे. विशेषत: शासनाच्या रोजगार हमी ...

लॉकडाऊनमध्ये मनरेगाच्या कामांना आला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे ठप्प असलेल्या रोजगारांच्या कामांना हळू हळू वेग येत आहे. विशेषत: शासनाच्या रोजगार हमी योजनेची अनेक कामे ग्रामीण भागात सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाले आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच कामे ठप्प झाले आहेत. हळू हळू जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: आदिवासी भागात रोजगाराचा मोठा प्रश्न असल्याने येथील परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांचे जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत विविध कामांवर सुमारे १६ हजार मजूर कामाला येत आहे. अक्कलकुवा तालुक्यातही सलग समतल चराचे कामे सुरू झाली आहेत. शनिवारी भोयरा, ता.अक्कलकुवा येथील या कामांवर मोठ्या प्रमाणावर मजूर उपस्थित होते. त्यामुळे कामालाही गती आली आहे.