सर्वोदय विद्यामंदिरात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:47 IST2020-02-09T12:46:55+5:302020-02-09T12:47:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. ...

सर्वोदय विद्यामंदिरात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. प्राचार्य आय.डी. पटेल यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती देऊन करिअरच्या संधी, भविष्यातील शिक्षण व उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले. हिरजी पाटील, किरण शिरसाठ, प्रा.एम.एम. सैयद, प्रा.शरद पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ममता पाटील तर आभार प्रा.पद्मा पाटील यांनी मानले.