शहाद्यातील 11 गणेश मंडळांकडून नवव्या दिवशी गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:38 IST2019-09-11T11:37:58+5:302019-09-11T11:38:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील तिस:या टप्प्यात गणरायाचे विसजर्न मोठय़ा उत्साहात पार पडल़े शहरातील 11 मंडळांनी मूर्तीचे विसजर्न ...

Message from the 11 Ganesh Circles of Martyrs to the Ganesh people on the ninth day | शहाद्यातील 11 गणेश मंडळांकडून नवव्या दिवशी गणरायाला निरोप

शहाद्यातील 11 गणेश मंडळांकडून नवव्या दिवशी गणरायाला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील तिस:या टप्प्यात गणरायाचे विसजर्न मोठय़ा उत्साहात पार पडल़े शहरातील 11 मंडळांनी मूर्तीचे विसजर्न केल़े शांततेत पार पडलेल्या या विसजर्न मिरवणूका रात्री उशिरार्पयत सुरु होत्या़ 
शहरातील राम राम गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, बजरंग गणेश मित्र मंडळ, शिवाजी नगर मित्र मंडळ, भवानी चौक गणेश मित्र मंडळ, चौधरी मित्र मंडळ, संत सेना मित्र मंडळ, जय श्रीराम गणेश मित्र मंडळ,  श्रीराम संस्कृती गणेश मंडळ, हिंदुह्रदयसम्राट गणेश मित्र मंडळ, सिंधी राजा मित्र मंडळ यांच्या मूर्तीचे विसजर्न करण्यात आल़े मंगळवारी दुपारी दीड वाजेपासून मंडळांकडून महात्मा गांधी पुतळ्याजवळ मंडळांकडून रांगा लावण्यास प्रारंभ झाला होता़ रांगेतील वाहनांच्या पुढे कार्यकर्ते लेङिाम नृत्य करत होत़े भाविकांची संख्या मोठी असल्याने शहादा पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस दलाने येथे जादा कुमक तैनात केली होती़ रात्री उशिरार्पयत शहरातील विविध मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणूका सुरु होत्या़ यातील काही मंडळांनी गोमाई पात्रात तर इतरांनी रात्री उशिरा प्रकाशा येथील नदीघाटावर मूर्तीचे विसजर्न केल़े  
तालुक्यातील वडछील येथे गणपती विसजर्नादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असल्याने पोलीसांकडून दक्षता घेण्यात येत आह़े यांतर्गत शहरातून वाहणा:या गोमाई नदी पात्राच्या दोन्ही बाजूस आणि पाडळदा चौफुलीवर पोलीस बंदोबस्त तैनात करुन लक्ष ठेवले जात आह़े 

शहरातील मलोणी भागातील मुरली मनोहर कॉलनीत गणपती विसजर्न मिरवणूक सुरु असताना दोन गटात बाचाबाची होऊन तुरळक दगडफेकीची घडली़ यात चार जण जखमी झाल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी भेट दिली़ पोलीस निरीक्षक किसन सजन पाटील, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, प्राचार्य तथा नगरसेवक मकरंद पाटील, नुर नुराणी यांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप केल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाल़े पोलीसांनी या भागात सुरक्षा कडे केल्यानंतर विसजर्न मिरवणूकांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आह़े 
 

Web Title: Message from the 11 Ganesh Circles of Martyrs to the Ganesh people on the ninth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.