व्यापाऱ्याचे पैसे लुटायला गेले आणि किराणा घेवून पळाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:14 IST2020-02-13T12:14:10+5:302020-02-13T12:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चौघांनी व्यापाºयाला लुटण्याचा प्लॅन केला, परंतु व्यापाºयाकडे पैसे न मिळाल्याने त्याच्याकडील साखर, शेंगदाणे व ...

व्यापाऱ्याचे पैसे लुटायला गेले आणि किराणा घेवून पळाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चौघांनी व्यापाºयाला लुटण्याचा प्लॅन केला, परंतु व्यापाºयाकडे पैसे न मिळाल्याने त्याच्याकडील साखर, शेंगदाणे व विडी घेवून चौघे पसार झाल्याची घटना धुळवद ते निझर रस्त्यावर ११ रोजी सकाळी घडली. यापैकी दोघांना नंदुरबार उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर लक्ष्मण पवार, रा.सरोजनगर, नंदुरबार, विशाल शैलेंद्र लहाने, रा.जिल्हाधिकारी वसाहत, नंदुरबार, विनोद पाडवी, रा.इंदिरानगर भिलाटी, नंदुरबार व आणखी एकजण अशी संशयीतांची नावे आहे. त्यापैकी शंकर पवार व विशाल लहाने यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, धुळवद येथील किराणा व्यावसायिक स्वरूपसिंग हावलू पाडवी हे निझर येथून किराणा माल भरून धुळवदकडे येत असतांना गावानजीक नाल्याजवळ त्यांना चौघांनी अडविले. खिशातील सर्व पैसे देण्याची मागणी केली. मारहाणही केली. व्यापारी पाडवी यांच्याकडे पैसे सापडले नाही, त्यामुळे चौघांनी त्यांच्याकडील १२०० रुपये किंमतीची साखर, शेंगदाणे व विडी घेवून पोबारा केला.
पाडवी यांनी गावात येवून हकीकत सांगितली. आजूबाजूला चौघांचा शोध घेतला असता ते सापडले नाही. त्यामुळे उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवून शंकर पवार व विशाल लहाने यांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही जप्त केली. तपास फौजदार प्रवीण पाटील करीत आहे.
दरम्यान, या जागेवर यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.