रोटरी नंदनगरीतर्फे मासिक पाळीवर प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:24+5:302021-03-10T04:31:24+5:30
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे शहरातील माळीवाडा परिसरातील स्वामी विवेकानंद हायस्कूल व नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूल ...

रोटरी नंदनगरीतर्फे मासिक पाळीवर प्रबोधन
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे शहरातील माळीवाडा परिसरातील स्वामी विवेकानंद हायस्कूल व नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात प-पाळीचा किशोरी आरोग्य पुस्तिका या नावाचे मासिक पाळीवर सरळ व सोप्या भाषेत प्रबोधन करणा-या पॉकेट पुस्तकाचे वितरण करण्यात आले. या पॉकेट पुस्तिकेत मासिक पाळीबद्दल शास्त्रशुद्ध माहिती व पाळीबद्दल शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यासाठीची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिका वाटपप्रसंगी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.जी. भावसार, निंबा माळी, वाय.एस. पाटील, संगीता ब्राह्मणे-पेंढारकर, सोनल महाले तर उमर्दे खुर्दे येथे मुख्याध्यापक आर.डी. कदमबांडे, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, आर.के. मोरे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम, सीमा सूर्यवंशी, जनसाहसचे शीतल जावरे, उमर्दे खुर्द येथील उपसरपंच सागर साळुंखे, अजय ठाकरे, पोलीस पाटील दिलीप चौधरी, ग्रामसेवक भरत आरगुळे आदी उपस्थित होते.