मेमू ट्रेन नंदुरबार स्थानकावर दाखल, आजपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:45 IST2019-02-16T12:45:23+5:302019-02-16T12:45:27+5:30
नंदुरबार : उधना-नंदुरबार व उधना-पाळधी या स्थानकादरम्यान १६ फेब्रुवारीपासून धावणाऱ्या मेमू ट्रेन नंदुरबार स्थानकात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, बांद्रा-भुसावळ ...

मेमू ट्रेन नंदुरबार स्थानकावर दाखल, आजपासून धावणार
नंदुरबार : उधना-नंदुरबार व उधना-पाळधी या स्थानकादरम्यान १६ फेब्रुवारीपासून धावणाऱ्या मेमू ट्रेन नंदुरबार स्थानकात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, बांद्रा-भुसावळ ही खान्देश एक्सप्रेस देखील १६ पासूनच धावणार आहे. या रेल्वे गाड्यांचा ई-शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पुर्ण झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त आहे. यामुळे आता मुंबईला जाण्याचे सोयीचे होणार आहे. या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार डॉ.हिना गावीत यांनी केले आहे.