पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक गावात बैठक घेणार- खासदार गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:06+5:302021-09-02T05:06:06+5:30

नवापुरातही बैठक... विविध कारणांमुळे शेतमाल, भाजीपाला कवडीमोल दराने विक्री करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परस्थिती नाजूक आहे. या परिस्थितीत ...

Meetings will be held in every village for distribution of crop loans - MP Gavit | पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक गावात बैठक घेणार- खासदार गावीत

पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक गावात बैठक घेणार- खासदार गावीत

नवापुरातही बैठक...

विविध कारणांमुळे शेतमाल, भाजीपाला कवडीमोल दराने विक्री करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परस्थिती नाजूक आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून आधार देणे आवश्यक आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा खासदार डॉ. हीना गावीत यांनी बुधवारी नवापूर तहसील कार्यालयातील सभागृहात पीककर्ज आढावा बैठकी दरम्यान दिला.

यावेळी आमदारडॉ. विजयकुमार गावीत, तहसीलदार मंदार कुलकुर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, मुख्याधिकारी महेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, सुप्रिया गावीत, नवापूर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत, राजेंद्र गावीत, एजाज शेख, जकीर पठाण, उपस्थित होते. नवापूर तालुक्यात ९ सप्टेंबर रोजी खांडबारा व श्रावणी येथे शिबिराचे आयोजन केले आहे. तर २० सप्टेंबर रोजी नवापूर, विसरवाडीत शिबिर घेण्यात येणार आहे. यात संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Meetings will be held in every village for distribution of crop loans - MP Gavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.