खांडबारा येथे व्यापाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:36+5:302021-08-15T04:31:36+5:30
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी सजग होण्याची गरज असून रात्री सर्वांनी घरापुढील व मागील ...

खांडबारा येथे व्यापाऱ्यांची बैठक
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी सजग होण्याची गरज असून रात्री सर्वांनी घरापुढील व मागील दरवाज्याजवळ लाईट सुरू ठेवावेत, बाजारपेठेतील सर्व गल्ल्यांमध्ये दुकानदारांनी हायपॉवरचे कॅमेरे बसवावेत, डी.व्ही.आर. गुप्त जागी ठेवावा, सायंकाळी दुकाने बंद करताना सर्व रक्कम सोबत घेऊन जावी, कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरगावी गेल्यास घरातील मौल्यवान ऐवज, पैसे सोबत किंवा बँकेत ठेवावेत, कुलूप लावून बाहेरगावी जायचे असल्यास शेजाऱ्यांना व पोलिसांना माहिती द्यावी म्हणजे पोलीस रात्री गस्तीच्यावेळी त्या घरांना भेटी देतील यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला गाव विकास आघाडीचे प्रमुख योगेश चौधरी, शैलेश गावीत, पद्माकर शिंदे, जगदीश चौधरी, अनिल शर्मा, सुनील भामरे, राजेंद्र वाघ, मनोज चौधरी, शब्बीर खाटिक, रहीम ईसानी, राजू खाटिक यांच्यासह गावातील सर्व व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.