काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:09 IST2019-07-23T12:09:18+5:302019-07-23T12:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक नंदुरबारातील विश्राम गृहात झाली. यावेळी जिल्हा ...

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक नंदुरबारातील विश्राम गृहात झाली. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तालुकानिहाय मेळावे घेणे, इच्छूक उमेदवारांची चाचपणी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस पक्षातूून काही नेत्यांची भाजपमध्ये होणारी आऊटगोईंग पहाता पक्षाने सावध पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभुमीवर जिल्हा परिषद निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी दुपारी विश्रामगृहात बैठक झाली.
बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अॅड.के.सी.पाडवी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक आदी उपस्थित होते.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार ठरविणे, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देणे, जे नेते पक्ष सोडून गेले त्याचा काय परिणाम होऊ शकतो यासह इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली.
लवकरच तालुकानिहाय मेळावे घेण्यात येणार आहे. या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्ये चैतन्य आणण्यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी यावेळी सांगितले.