ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत विविध विषयांवर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:21 IST2020-01-20T15:21:21+5:302020-01-20T15:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कहाटूळ : श्रीराम समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्व साधारण सभा कहाटूळ, ता.शहादा येथील राम मंदिरात ...

ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत विविध विषयांवर बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
कहाटूळ : श्रीराम समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्व साधारण सभा कहाटूळ, ता.शहादा येथील राम मंदिरात निवृत्त मुख्याध्यापक जाधव वेडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीस प्रा.डी.एस. पाटील, शंकर झिपरू माळी, धरमदास सोमजी पाटील, एकनाथ लक्ष्मण पाटील, सखाराम दत्तु पाटील, डॉ.पी.एस. पवार, डोंगर बुला पाटील, मोहन पाटील, राजाराम पाटील, सखाराम दत्तू पाटील, काशिनाथ चौधरी, रतिलाल सुपडू पाटील आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सभेत ६० वर्षावरील निराधार कृषी काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार पेन्शन मिळणार आहे, या योजनेबद्दल केंद्र सरकारच्या आभाराचा ठराव करण्यात आला. तसेच आई-वडीलांचे हाल करणाºया मुला-मुलींना नवीन कायद्यान्वये चांगलीच चपराक बसणार आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सर्वांनी मिळून सोडविल्या जातात. कोणाकडे काही अप्रिय घटना घडल्यास संघटनेचे पदाधिकारी धावू जातात. त्यामुळे या संघटनेचे गावकऱ्यांकडू कौतुक केले जाते. तसेच ज्या कोणी ज्येष्ठ नागरिकास या संघटनेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी जाधव यांच्याकडे संपर्क साधावा, असे ही करण्यात आले आहे. आभार कल्पना पाटील यांनी मानले.