पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:32+5:302021-02-05T08:11:32+5:30

मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या मुख्य कार्यालयात नियामक मंडळाची सभा झाली. सभेला मंडळाच्या मानद सचिव कमलताई ...

Meeting of Pujya Sane Guruji Vidya Prasarak Mandal | पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाची सभा

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाची सभा

मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या मुख्य कार्यालयात नियामक मंडळाची सभा झाली. सभेला मंडळाच्या मानद सचिव कमलताई पाटील, अर्थ व बांधकाम विभाग समन्वयक पी.आर. पाटील, सामान्य व शैक्षणिक विभाग समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक रमाकांत शंभू पाटील, राजेश उत्तम पाटील, प्रेमसिंग हिंमतसिंग आहेर, दीपक रमणलाल पटेल, राजाराम दुल्लभ पाटील, अ‍ॅड.प्रफुल्ल गजानन पाठक आदींची उपस्थिती होती.

या सभेत शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विविध विद्याशाखांच्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सभेत मंडळाच्या उपाध्यक्षपदी पिंप्री, ता.शहादा येथील नियामक मंडळ सदस्य जगदीश गिरधर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपाध्यक्ष जगदीश पाटील म्हणाले की, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आपण सदैव तत्पर राहू. मंडळाने दाखवलेला विश्वास व टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू.

नियामक मंडळाच्या सभेत प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ.एस. पी. पवार, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्राचार्य डॉ. डी. एम. पाटील, प्राचार्य डॉ.पी. एल. पटेल, प्राचार्य डॉ.जे. आर. पाटील यांनी आपापल्या विद्याशाखांचा शैक्षणिक अहवाल सादर केला.

Web Title: Meeting of Pujya Sane Guruji Vidya Prasarak Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.