शहरात शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:59 IST2019-11-05T12:59:02+5:302019-11-05T12:59:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पंचायत समिती सभागृहात शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली़ यावेळी ईद-ए-मिलाद आणि जन्मभूमी ...

शहरात शांतता कमिटीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पंचायत समिती सभागृहात शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली़ यावेळी ईद-ए-मिलाद आणि जन्मभूमी निकाल या दोन मोठय़ा घडामोडींमुळे कायदा व सुव्यवस्था कायम राहिल याबाबत चर्चा करुन सूचना करण्यात आल्या़
बैठकीस तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपनगराध्यक्ष परवेज खान करामत खान, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सुनील नंदवाळकर, माजी उपनगराध्यक्ष राजेश परदेशी, संतोष पाटील यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होत़े
यावेळी तहसीलदार थोरात यांनी 10 नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्याबाबत आवाहन केल़े उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी येत्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आह़े सोशल मिडियात जातीय द्वेष निर्माण होईल असे मेसेज व्हायरल करु नये असे सांगितल़े पोलीस निरीक्षक भापकर व नंदवाळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केल़े
बैठकीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची ग्वाही सदस्यांकडून देण्यात आली़ येत्या काळात रामजन्मभूमी व बाबरी मशिदबाबत सर्वोच्च न्यायानयाकडून निकाल दिला जाणार आह़े या पाश्र्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली़ जिल्ह्यातील विविध भागात पोलीस दल व महसूल विभागाकडून बैठका घेऊन सर्व जाती धर्मातील नागरिकांची जागृती सुरु आह़े तसेच सोशल मिडीयावर लक्ष ठेवले जात आह़े