पपई दराबाबतची बैठक फिस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:59 IST2020-03-18T12:59:35+5:302020-03-18T12:59:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सध्या मार्केटमध्ये मंदी असल्याने वाढीव दर देणे परवडत नसल्याचे कारण व्यापाऱ्यांनी पुढे करत पपई ...

The meeting on papaya rates slipped | पपई दराबाबतची बैठक फिस्कटली

पपई दराबाबतची बैठक फिस्कटली

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सध्या मार्केटमध्ये मंदी असल्याने वाढीव दर देणे परवडत नसल्याचे कारण व्यापाऱ्यांनी पुढे करत पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात पपई दरासंबंधी झालेली बैठक फिस्कटली. व्यापाऱ्यांनी नऊ रुपयांच्यावर दर देण्यास नकार दिला. शेतकºयांच्या वतीने ११ रुपये प्रती किलो दराची मागणी करण्यात आली. परंतु व्यापारी आपल्या मतावर ठाम असल्याने बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, संचालक रवींद्र रावल, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील, माधव पाटील, सतीश पाटील, उमेश पाटील, दीपक पाटील आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. सध्या बाजारपेठेत पपईला मागणी असूनही व्यापारी शेतकºयांना वेठीस धरून लूट करीत आहेत यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकºयांनी ११ रुपये दराची मागणी केली. परंतु व्यापाºयांनी त्यास विरोध करत नऊ रुपयांच्यावर दर देण्यास नकार दिल्याने बैठक फिस्कटली. इतर बाजारपेठेतील दरांची तुलनाही करण्यात आली. परंतु स्थानिक पपई खरेदीदार व्यापारी शेतकºयांना वाढीव दर देण्यास नकार दिला. अखेर शेतकºयांनी पपई तोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जो व्यापारी अपेक्षित दर देईल त्याच व्यापाºयांना पपई द्यावी अन्यथा पुढील निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्यात यावा, असा निर्णय समन्वय समिती व शेतकºयांनी घेतला. दरम्यान, यंदा वातावरणाच्या बदलामुळे लागवड उशिरा झाली. त्यामुळे फळधारणाही उशिराने सुरुवात झाली. आता काही शेतकºयांचे उत्पादन निघायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सहाजिकच हंगाम लांबला. त्याचा गैरफायदा व्यापारी उचलत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरवर्षी मात्र यावेळेस हंगामाचा शेवट असतो. पपई खरेदीदार व्यापाºयांनी शेतकºयांना वेठीस न धरता अपेक्षित दर द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: The meeting on papaya rates slipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.