शहादा पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:13 IST2020-05-03T13:13:04+5:302020-05-03T13:13:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढून नऊ झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात ...

Meeting of officers in Shahada Municipality | शहादा पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक

शहादा पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढून नऊ झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील यासाठी नगराध्यक्षांनी पालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
पालिकेत सामाजिक अंतर ठेऊन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांंनी कोरोना साथीचा प्रादुर्भाव कसा कमी होइल? त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविता येतील यासाठी बैठक बोलावली होती. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या याबैठकीस जिल्हा परिषद बांधकाम सभापती अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ व पालिकेचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीत शहरातील आरोग्यासंदर्भात नगरसेवकांनी काही सूचना केल्या. मागील काही दिवसापासून होत असलेल्या कामांचा आढावा घेऊन मुख्याधिकारी राहुल वाघ व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले.

Web Title: Meeting of officers in Shahada Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.