राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शहादा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:14 IST2020-11-20T12:14:13+5:302020-11-20T12:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शहादा येथे बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, युवती जिल्हाध्यक्षा दीपमाला पाटील, निखिल तुरखिया, डॉ.सनंसे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते
या वेळी अनिल गोटे म्हणाले की, आदिवासींच्या विविध योजनांचा निधी जिल्ह्याला मिळावा. जिल्ह्याला निधी कमी पडतो आहे. राजकारणात नेते व कार्यकर्त्यांचे येणे-जाणे सुरूच असते. त्याचा विचार न करता सगळ्यांनी एकसंघपणे कोणत्याही प्रकारची गटबाजी न करता पक्ष मजबूत करावा, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष डॉ.मोरे म्हणाले की, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या पाठीशी उभे राहून साथ देऊन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलंद आवाज करावा. आपसातील मतभेद विसरुन जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. उदेसिंग पाडवी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
बैठकीला शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.डी. पाटील यांनी केले.