एकात्मतेच्या ‘सरदारा’ला मानवंदना देण्यासाठी जमले साऱे़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:15 IST2019-11-01T21:15:44+5:302019-11-01T21:15:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने      शहरातील विविध मार्गावरुन एकता रॅली काढून ...

Meeting to greet the 'Sardar' of solidarity | एकात्मतेच्या ‘सरदारा’ला मानवंदना देण्यासाठी जमले साऱे़़

एकात्मतेच्या ‘सरदारा’ला मानवंदना देण्यासाठी जमले साऱे़़

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने      शहरातील विविध मार्गावरुन एकता रॅली काढून एकात्मतेचे प्रतिक असलेले सरदार वल्लभाई पटेल यांना मानवंदना देण्यात आली़ रॅलीतील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतल़े रॅलीत जिल्हाभरातून हजारो लोकांचा सहभाग होता़         
शहरातील गिरीविहार येथील सरदार पटेल चौकातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला़ तत्पूर्वी अखिल भारतीय गुजर्र समाजाचे अध्यक्ष दिपक पाटील, एनटीव्हीएसचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, हिरा उद्योग समुहाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, कमलताई पाटील, माजी उपनगराध्यक्षा शोभा मोरे, नगरसेविका ज्योती पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पृथ्वीराज रघुवंशी, सुमनबेन पाटील यांच्याहस्ते रॅलीला हिरवी ङोंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला़ उड्डाणपुल, गांधी पुतळा मार्गाने हुतात्मा चौकात एकता रॅलीचे विसजर्न करण्यात आल़े रॅलीत सरदार पटेल यांचा जीवनपट दर्शवणारे प्रदर्शन, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे लेझीम व झांज पथक लक्ष्यवेधी ठरल़े एकसुर एक तालात युवतींने खेळल्या गेलेल्या लेङिाममुळे रॅलीत चैतन्य निर्माण झाले होत़े रॅलीत  जिल्हा भरातील युवक, युवती, महिला व पुरुष सहभागी झाले होत़े त्यांच्याकडून विविध वेषभूषांसह जनजागृतीपर फलक लावून स्वच्छतेचा जागर करण्यात आला़ 
लहान लोणखेडा येथील श्रीराम कॉलनी नवयुवक मंडळांकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटाची छायाचित्रांच्या स्वरुपात मांडणी करण्यात आल होती़ पातोंडा येथील जय बजरंग नवयुवक व नवयुवती मंडळ आणि पातोंडा ग्रामस्थ यांनी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना वृक्षांचे वाटप केल़े शिस्तबद्ध अशा या एकता रॅलीत व्हीएसजीजीएमच्या स्वंयसेवकांनी वाहतूक सुरळीत ठेवत पाणी व सहभागींना विविध पदार्थाचे स्वच्छता राखत वाटप केल़े 
हुतात्मा उद्यानात रॅलीचा समारोप करण्यात आल्यानंतर याठिकाणी व्याख्यान व रक्तदान शिबिर घेण्यात आल़े रॅली दरम्यान किंवा रॅलीनंतर कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ 

Web Title: Meeting to greet the 'Sardar' of solidarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.