जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:16 IST2019-11-14T12:16:39+5:302019-11-14T12:16:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे ...

जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे घेण्यात आली़ या बैठकीत नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिका:यांनी उपस्थिती देत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणली़
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी यांनी नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असुन जिल्ह्यात 90 ग्रामपंचायती नव्याने निर्माण करण्यात आल्या आहेत़ याठिकाणी अद्यापही ग्रामसेवकांची भरती झालेली नाही़ जिल्हा परिषदेमार्फत शासनाला पत्रव्यवहार करुन ग्रामसेवकांची भरती करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करुनही आजवर कारवाई करण्यात आलेली नाही़ नंदुरबार जिल्ह्यात पेसा कायदा लागू असल्याने या कायद्यांतर्गत पेसा क्षेत्रात पेसा कर्मचारी नियुक्त करण्याची शासनाची प्रथम जबाबदारी असतानाही कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी राज्याच्या पदाधिका:यांसमोर आणून दिल़े
जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर झालेल्या चर्चेतून राज्य संघटनेमार्फत राज्य शासनाला पाठपुरावा करुन नंदुरबार जिल्ह्याचा प्रश्न सोडवावा, जिल्ह्यातील अवैध ठेकेदारी बंद करण्यात यावी असे ठरवण्यात आल़े तसेच नंदुरबार जिल्हा परीषद प्रशासनाने ग्रामसेवक संवर्गाचे सर्व विषय मार्गी लावल्याबद्दल संघटनेचे कौतूक करण्यात येऊन अभिनंदानाचा ठराव मंजूर करण्यात आला़ दरम्यान रविंद्र वळवी यांनी जिल्हा संघटनेच्या त्रैमासिक अहवालाचे वाचन केल़े
यावेळी विभागीय सहसचिव पी़जी़सोनवणे, जिल्हा सरचिटणीस आऱआऱ शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर खर्डे, नंदुरबार तालुकाध्यक्ष आऱडी़पवार, मानद अध्यक्ष भागवत सिसोदे, संतोष शिंदे, नरेंद्र पाटील, एस़एस़मंडले, अनिल निकम, पी़जी़ माळी़ एस़व्ही़देवरे आदी उपस्थित होत़े