नंदुरबार तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व तलाठींची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:18+5:302021-08-13T04:34:18+5:30
या बैठकीत ई-पीक पाहणी प्रशिक्षणासह वसुली, मागणी व नियोजन आराखडा, जिल्हा खनिज आराखड्यासाठी गट नंबरसह प्रस्ताव तयार करणे, ...

नंदुरबार तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व तलाठींची बैठक
या बैठकीत ई-पीक पाहणी प्रशिक्षणासह वसुली, मागणी व नियोजन आराखडा, जिल्हा खनिज आराखड्यासाठी गट नंबरसह प्रस्ताव तयार करणे, अवैध गौण खनिज दंडनीय कारवाई, खदानधारक यांच्याकडे थकबाकी व क्रशर यांच्याकडील लाईट बिलाप्रमाणे वसुली, वीटभट्टी संख्या निश्चित करणे, कलम १५५, दवंडी रजिस्टर, चावडी वाचन, आढळून आलेल्या चुका आणि चुकांची दुरुस्ती केल्याबाबत अहवाल, ४२ ब, ४२ क, ४२ ड प्रकरणात वसुली, कलम ६३ नुसार खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनार्थ खरेदी जमीनसंदर्भात कारवाई, तगाई, बंडिंग व सावकारी अशा कालबाह्य नोंदी कमी करणे, आकस्मिक मृत्यूसमयी मंजूर करणे प्रकरणात जाहीर प्रगटन प्रसिद्धी, भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीची स्थळ पाहणी, वर्ग दोन जमिनींचा नमुना १-क शी ताळमेळ घेणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून सात-बारा संगणकीकरणाबाबत आढावा घेतला, तसेच नाशिक आयुक्त यांनी सात-बारा संगणकीकरणामध्ये नवीन होणाऱ्या बदलांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्याला पीक पाहणी स्मार्ट फोनद्वारे नोंदणी करता येईल व सात-बारा ड पत्रक हे सुद्धा स्मार्टफोनमध्ये बघता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.