प्रकाशा येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:14+5:302021-02-07T04:29:14+5:30
अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, जि. प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र ...

प्रकाशा येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, जि. प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि. प. सदस्य धनराज पाटील, भारती ठाकरे, तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, माजी अध्यक्ष हरी पाटील, वासुदेव पाटील, संजय पाटील, नारायण सामुद्रे, किशोर पाटील, दिलीप पाटील, रफीक खाटीक, पंडित भोई, प्रकाशाचे सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सरपंच उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शहादा तालुक्यात निवडून आलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गावित म्हणाले की, पक्षात कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असून, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तर काहीही घडू शकते. राज्यात सत्ता नसली तरी केंद्रात आपल्या पक्षाची सत्ता असून, शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पक्ष संघटन मजबूत करावे. आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे व पक्षाची ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवावी. कुठल्याही निवडणुकीत बूथ हा महत्त्वाचा घटक असून, बूथ स्तर मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत व नवीन तरुण कार्यकर्त्यांची बूथ समितीत निवड करावी, असे सांगितले. विजय चौधरी म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, सक्षम कार्यकर्त्यांचा बूथ समितीत समावेश करून मतदारसंघातील मंदिर, मठ, आश्रम यांचे प्रमुख पुजारी ग्रामपंचायतीमधील विजयी, पराभूत सरपंच, सदस्य तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी, सहकारी दूध संस्था, सहकारी संस्था, अन्य सहकारी संस्था, मतदारसंघातील बचत गट यांच्याशी पक्ष सदस्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तालुका भाजपच्या प्रकाशा मंडळातील बैठकीसाठी प्रकाशा, वैजाली, सारंखेडा, कळंबू, तोरखेडा, फेस, बामखेडा, कुकावल, कोठली, जयनगर, कहाटूळ, डामरखेडा, लांबोळा, शेल्टी, भादा, धुरखेडा, परिवर्धा, आदींसह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केदारेश्वर मंदिर ट्रस्ट समिती व तालुका भारतीय जनता पक्षातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ईश्वर पाटील यांनी, तर सूत्रसंचालन हरी पाटील यांनी केले.