5 मार्च रोजी विधान भवनावर धडक : कुंभार समाजाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:27 IST2018-02-10T12:27:42+5:302018-02-10T12:27:46+5:30

5 मार्च रोजी विधान भवनावर धडक : कुंभार समाजाची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 5 मार्च रोजी मुंबई येथील विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आह़े याबाबत शुक्रवारी खान्देश विभागीय दौरा महासंघातील पदाधिकारी यांची बैठक नंदुरबारात संपन्न झाली़
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष संजय गाते उपस्थित होत़े या वेळी इतर पदाधिकारीही उपस्थित होत़े
सोबत नंदुरबार जिल्हाध्यक्ष उत्तमराव कुंभार, खान्देश विभागीय अध्यक्ष सुभाष कुंभार, जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, जळगाव उपअध्यक्ष सुभाष पंडीत, विभागीय सचिव सखाराम मोरे तसेच समाज बांधव किशोर कुंभार, रतीलाल कुंभार, सुरेश व:हाळकर, चंद्रशेखर वाडीले, आनंद कुंभार त्याच प्रमाणे मोठय़ा संख्येने समाज बांधव उपस्थित होत़े बैठकीत विविध प्रस्तावांना मंजुरीदेखील देण्यात आली़