विलगीकरण कक्षात औषधी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:56+5:302021-04-13T04:28:56+5:30

राणीपूर येथे ५० च्यावर कोरोना रुग्णांची संख्या झाली असून, ग्रामपंचायतीकडून दोनवेळा औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. गाव पूर्णत: ...

Medicine and staff should be appointed in the segregation room | विलगीकरण कक्षात औषधी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

विलगीकरण कक्षात औषधी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

राणीपूर येथे ५० च्यावर कोरोना रुग्णांची संख्या झाली असून, ग्रामपंचायतीकडून दोनवेळा औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. गाव पूर्णत: बंद करण्यात आले असून, जनजागृतीही करण्यात येत आहे. राणीपूर येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला; मात्र या कक्षात औषध पुरवठा, डाॅक्टर, परिचारिका यांची आवश्यकता आहे. राणीपूर परिसरातील १० ते १५ गावांतील परिस्थिती पाहता येथे रुग्णवाहिका व दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा विलगीकरण कक्ष फक्त ग्रामपंचायतीच्या भरवशावर सुरू झाल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाने येथे पुरेसा औषधीसाठा, डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी पुरविण्याबाबत लक्ष द्यावे; अन्यथा हा विलगीकरण कक्ष कुचकामी ठरेल, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Medicine and staff should be appointed in the segregation room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.