मेडीकल कॉलेज कंत्राटी कर्मचा:यांच्या मुळावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:02 IST2019-09-08T12:01:59+5:302019-09-08T12:02:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचा:यांची सेवा खंडीत करण्याचा ...

मेडीकल कॉलेज कंत्राटी कर्मचा:यांच्या मुळावर !
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचा:यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे 100 पेक्षा अधीक कर्मचा:यांवर बेरोजगाराची कु:हाड कोसळणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या सर्व आदेशांमध्ये सर्व पदे कायम ठेवण्याचे म्हटले असतांनाही हा निर्णय होत असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
नंदुरबारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाल्याने जिल्हा रुग्णालय टप्प्याटप्प्याने वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अधिनस्त काही पदे वर्ग करणे, काही तसेच ठेवणे तर काही व्यपगत करणे अशा सुचना शासनाच्या अद्यादेशात देण्यात आलेल्या आहेत. याउलट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजनांअंतर्गत कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांची सर्व पदे पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियंत्रणाखाली राहतील असे आदेशात स्पष्ट म्हटलेले आहे. असे असतांना एनआरएचएमअंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचा:यांना कार्यमुक्त करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. 30 सप्टेंबर रोजी या कर्मचा:यांची सेवा समाप्ती करण्याचे त्यात म्हटले आहे.
याबाबत कर्मचा:यांनी आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. परंतु दखल घेतली जात नसल्याचे कंत्राटी कर्मचा:यांचे म्हणने आहे. जवळपास 100 पेक्षा अधीक अधिकारी व कर्मचा:यांवर यामुळे बेकारीची कु:हाड कोसळणार आहे. शासनाने याबाबत अद्यादेशातील तरतुदींप्रमाणे निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा या कर्मचा:यांनी दिला आहे.
अध्यादेशाची तोडफोड.. जिल्हा रुग्णालय नंदुरबार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पुर्णत: हस्तांतरीत करण्याच्या शासनाच्या 9 जानेवारी 2019 च्या अध्यादेशात त्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांनी राष्ट्रीय नागरि आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालकांना लिहिलेल्या पत्रात काही पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत व काही कार्यक्रम हे स्वतंत्र असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसल्याचे म्हटले आहे. असे असतांनाही हे आदेश निघाल्याने कर्मचा:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.