कोरोनाचे ६८ रुग्ण आढळल्याने करणखेडा येथे उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:55+5:302021-03-01T04:35:55+5:30
करणखेडा या लहानशा गावात कोरोनाचा शिरकाव होऊन ६८ रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात २५ ...

कोरोनाचे ६८ रुग्ण आढळल्याने करणखेडा येथे उपाययोजना
करणखेडा या लहानशा गावात कोरोनाचा शिरकाव होऊन ६८ रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात २५ पुरुष, ३६ महिला व सात लहान बालकांचा समावेश आहे. करणखेडा गावात प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे विवेक बावस्कर, प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी, रामा वळवी आदींनी भेट देऊन गावात जनजागृती केली. गावात काही ठिकाणी पुन्हा सर्व्हे करण्यात आला. रुग्ण वाढू नये यासाठी गाव बंद करण्यात आले असून बाहेरील व्यक्तींना बंदी करण्यात आली आहे. येथील ३३ रुग्णांना मोहिदा येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज भेट देऊन जनजागृती करणार आहेत. उपसरपंच चुनिलाल पाटील यांनी सांगितले की, गावात कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. गाव पूर्णतः बंद करण्यात आलेले असून बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेशबंदी केली आहे व योग्य ती खबरदारी घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.