तायक्वांदो बेल्ट परीक्षेतील गुणवंत खेळाडूंना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते बेल्ट प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:35+5:302021-09-03T04:31:35+5:30
येथील नगरपालिका शाळा क्रमांक एकच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून ...

तायक्वांदो बेल्ट परीक्षेतील गुणवंत खेळाडूंना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते बेल्ट प्रदान
येथील नगरपालिका शाळा क्रमांक एकच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक परवेज खान, पाणीपुरवठा विभाग सभापती कैलास पाटील, नगरसेवक हारून हलवाई, शेख रियाज, सय्यद इसरार अली, शेख साबीर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रघुवंशी म्हणाल्या की, तायक्वांदो हा खेळ मुलींना स्वरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. इथे मुलींची संख्या जास्त असल्याचे पाहून आनंद झाला. कोरोनाकाळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तायक्वांदोसारखे खेळ सर्व मुलांसाठी आवश्यक आहे. परवेज खान यांनीही मनोगत व्यक्त केले.
तायक्वांदो जिल्हा प्रशिक्षक जावेद बागवान यांनी सांगितले की, तायक्वांदो खेळातून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे म्हणून तायक्वांदो जिल्हा असोसिएशनतर्फे १५ वर्षांपासून तायक्वांदो स्पर्धा, कॅम्प, शिबिरांच्या माध्यमातून तायक्वांदो खेळाचा प्रसार प्रचार करत आहेत.
सूत्रसंचालन हैदर जाफर यांनी केले. आभार जावेद बागवान यांनी मानले.
यावेळी काजी सुफियान, शाहीद मिया, साहिल शेख, केशव पावरा, शेख रहीम आदी उपस्थित होते. उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना बेल्ट आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. रेड बेल्ट पाच खेळाडू, ब्ल्यू बेल्ट १२ खेळाडू, ग्रीन बेल्ट पाच खेळाडू व येलो बेल्ट २२ खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.