कोरोना व्हायरसच्या भितीने मास्कची विक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:37 IST2020-03-06T11:37:02+5:302020-03-06T11:37:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनो व्हायरसच्या भितीमुळे नंदुरबारात मास्क आणि सॅनीटायझर यांना अचानक मागणी वाढली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ...

Mask sales spiked with fear of the Corona virus | कोरोना व्हायरसच्या भितीने मास्कची विक्री वाढली

कोरोना व्हायरसच्या भितीने मास्कची विक्री वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनो व्हायरसच्या भितीमुळे नंदुरबारात मास्क आणि सॅनीटायझर यांना अचानक मागणी वाढली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तशा सुचना दिल्या गेल्याने ही मागणी वाढल्याचे बोलले जात आहे.
कोरोनो व्हायरसचा महाराष्टÑातही शिरकाव झाल्याने दक्षता घेण्याचे आवाहन शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक कंपन्या, शासकीय कार्यालये यांना शासनातर्फे करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणाहून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे आवश्यक करण्यात आले आहे. या व्हायरसची मनात घालण्यात आलेली भिती लक्षात घेता गेल्या दोन दिवसात मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर यांना मागणी वाढली आहे.
काही शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचा केला आहे. त्यामुळे मास्कची मागणी दोन दिवसात ३० ते ४० टक्के वाढली आहे. मास्कची किंमत २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे. मागणी वाढल्याने येत्या काही दिवसात त्यांच्या किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना दप्तरात सॅनीटायझर देखील आणण्याच्या सुचना काही शाळांनी दिल्याचे समजते.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची भिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. सोशल मिडीयाद्वारे देखील याबाबत विविध मेसेज व्हायरल केले जात आहेत. काहींनी जनजागृतीपर मेसेला प्राधान्य दिले आहे. तर काही मेसेजमुळे गैरसमज देखील पसरविला जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Mask sales spiked with fear of the Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.